शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

झीप क्वॉईनची व्याप्ती ६५ कोटींपेक्षा अधिक -३८ जणांची बँक खाती सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:59 IST

कोल्हापूर : झीप क्वॉईनमध्ये गुंतवणूकदारास महिन्याला लाखो रुपयांचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या भामट्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची ६५

ठळक मुद्देमहाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यांतील गुंतवणूकदारांची फसवणूक

कोल्हापूर : झीप क्वॉईनमध्ये गुंतवणूकदारास महिन्याला लाखो रुपयांचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या भामट्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची ६५ कोटींची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. कंपनीचे अनिल नेर्लेकर, राजेंद्र नेर्लेकर, संजय कुंभार यांच्यासह ३८ जणांची बँक खाती पोलिसांनी सील केली, तर संशयितांकडून दोन आलिशान कार जप्त केल्या आहेत.संशयितांनी झीप क्वॉईनचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत पैसे गुंतविण्यासाठी महाराष्ट्रातील मोठे जिल्हे, कर्नाटक आणि गोवा येथील एजंटांची साखळी तयार केली. एजंटांना२० ते ३० हजार रुपये पगार देऊन जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना कंपनीपर्यंत आणण्यासाठी उद्दिष्ट दिले. गुंतवणूकदारांवर प्रभाव पाडण्यासाठी ते आलिशानवाहनातून फिरणे व पंचतारांकित हॉटेलमध्ये सेमिनार घेतले जात होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव, गोवा या ठिकाणच्या बड्या उद्योजकांनी या कंपनीत लाखो रुपये गुंतविले आहेत. संचालकांनी गुंतवणूकदारांसह परदेशवारी केल्याचे तपासात पुढे आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचेपोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रांनुसार गुंतवणूकदारांची यादी तयार केली जात आहे. कंपनीच्या कार्यालयातून संगणकाची हार्डडिस्क, लॅपटॉप, पावती पुस्तके, बँकेची पासबुके जप्त केली आहेत. त्यातून गुन्हा दाखल असणाºया तिघांसह इतर सहा संशयितांची बँक खाती सील करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्णातील सर्व बँकांना पत्रे पाठविली आहेत तसेच इतर राज्यांतील बॅँकांतही पत्रे पाठवण्याचे काम सुरू आहे. अटकेतील तिघांच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. अटक तिघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत ५ दिवसांनी वाढ करण्यात आली.परजिल्ह्यातील तक्रारदारांचाही पुढाकारफसवणूक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी येथील १० तक्रारदार पुढे आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन जबाब नोंदविले आहेत.जमीन, सोन्यात गुंतवणूकसंशयितांनी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत फसवणुकीतील रक्कम त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह प्लॉट, फ्लॅटमध्ये गुंतवणूक केल्याचे समजते. त्या मालमत्तांच्या शोधासाठी पोलीस नातेवाईकांकडेही चौकशी करणार आहेत.